Dhananjay Munde । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील जोरदार मागणी होत आहे.
यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “राजीनाम्यावर मी काही बोलणार नाही. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देतील आणि त्यांनीच उत्तर द्यावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. माझ्या राजीनाम्याची अजून कोणी मागणी केलेली नाही,” असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा, अशी प्रतिक्रिया मुडेंनी दिली होती. यावरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) वर सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी एक्सवर पोस्ट करत निशाणा साधला आहे.
Bhaiya Patil Post on X
“हाल हाल करून ठार मारलेले संतोष देशमूख हे सुद्धा दोन लेकरांचे बाप होते.. त्या दोन्ही लेकरांना काय वाटत असेल.. त्यांच्या बापाची हत्या तुमच्या लोकांनी केली त्या लेकरांना न्याय सुद्धा मिळवू देत नव्हते..आज ती लेकरं महाराष्ट्रभर वणवण फिरत बापासाठी न्याय मागत आहेत तेव्हा तुम्हाला दुःख वाटत नाही.. पण तुमच्या नराधम नीच वाल्मिकच्या गैरकृत्यात तुमचे नाव आले तर तुमच्या लेकरांना त्यांच्या मित्रानी विचारले तर खूप दुःख झालं…अहो बाप गेलेल्या त्या लेकरांचे दुःख तुम्हांला नाही का वाटत?? का असे भावनिक मुद्दे काढून नीच नराधम वाल्मिक गँगला वाचवत आहात??”, असा आरोप भैया पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :