Share

काय आहे DeepSeek AI? ज्याने जगभरात घातलाय धुमाकूळ, वाचा सविस्तर

DeepSeek AI, a Chinese AI model rivaling Chat GPT, Meta AI, seems to be taking the world by storm. America has lost sleep because of this system of China.

by MHD

Published On: 

What is DeepSeek AI? Know in detail

🕒 1 min read

DeepSeek AI । सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वकाही करणे शक्य झाले आहे. यामुळे अद्भूत आणि आश्चर्यकारक बदल झाले आहेत. आर्टिफिशीयल इंन्टेलिजन्स (Artificial Intelligence) ची मदत घेऊन तासाभरात होणारे काम आता चुटकीसरशी होऊ लागल्याने मनुष्यबळ देखील कमी लागत आहे.

परंतु आता चॅट जिपीटी (Chat GPT), मेटा एआय (Meta AI) ला टक्कर देणारे चीनी एआय मॉडेल DeepSeek AI हे जगभरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चीनच्या या यंत्रणेमुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अगदी कमी पैशात DeepSeek AI चॅट बॉट आले आहे.

त्यामुळे अनेकांना DeepSeek नेमकं काय आहे? असा प्रश्न पडला आहे. DeepSeek बद्दल सांगायचे झाले तर DeepSeek R1 हे ओपन सोअर्स एआय मॉडेल आहे. याचा परवाना मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेकडे असून यामुळे कोणत्याही समस्येचे समाधान शोधण्यासाठी हा एक खुला आणि मोफत असा मंच आहे.

लियांग वेनफेंग हे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. लाँच झाल्यानंतर काही क्षणातच हा चॅटबॉट बाजारात खूप लोकप्रिय झाला आहे. हे लक्षात घ्या की तुम्ही प्ले स्टोअरवरून तसेच आयओएस स्टोअरवरून हे अॅप इन्स्टॉल करता येईल.

What is DeepSeek AI?

दरम्यान, लियांग यांनी हे चॅटबॉट मॉडेलची निर्मिती 60 लाख डॉलर्सपेक्षा कमी (सुमारे 52 कोटी रुपये) पैशात केली आहे. इतक्या कमी निर्मिती मुल्यामुळे सध्या या मॉडेलची जगभरात चर्चा होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही