🕒 1 min read
Dhananjay Munde । वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या राजकीय वर्तुळातून जोर धरू लागली आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच आता धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुंडे आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यात दुपारी 12 वाजताच्या दरम्यान भेट होईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली होती.
Dhananjay Munde Resignation
याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांच्या राजीनाम्यावर कोणता निर्णय होतोय? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर दिल्लीत त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाला तर हा मुंडेंसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. मुलांना मित्र काय म्हणत असतील विचार करा, अशी प्रतिक्रिया मुडेंनी दिली होती. यावरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी एक्सवर पोस्ट करत निशाणा साधला आहे.
Bhaiya Patil Post on X
“हाल हाल करून ठार मारलेले संतोष देशमूख हे सुद्धा दोन लेकरांचे बाप होते.. त्या दोन्ही लेकरांना काय वाटत असेल.. त्यांच्या बापाची हत्या तुमच्या लोकांनी केली त्या लेकरांना न्याय सुद्धा मिळवू देत नव्हते..आज ती लेकरं महाराष्ट्रभर वणवण फिरत बापासाठी न्याय मागत आहेत तेव्हा तुम्हाला दुःख वाटत नाही.. पण तुमच्या नराधम नीच वाल्मिकच्या गैरकृत्यात तुमचे नाव आले तर तुमच्या लेकरांना त्यांच्या मित्रानी विचारले तर खूप दुःख झालं…अहो बाप गेलेल्या त्या लेकरांचे दुःख तुम्हांला नाही का वाटत?? का असे भावनिक मुद्दे काढून नीच नराधम वाल्मिक गँगला वाचवत आहात??”, असा आरोप भैया पाटील यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Local Body Elections । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या! कोर्टाकडून नवीन तारीख जाहीर
- “Santosh Deshmukh यांची लेकरं न्यायासाठी वणवण…” ‘बापाचं काळीज म्हणणाऱ्या’ Dhananjay Munde यांच्यावर टीका
- काय आहे DeepSeek AI? ज्याने जगभरात घातलाय धुमाकूळ, वाचा सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










