Local Body Elections । राज्यातल्या जनतेला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. याचसंदर्भात काल मागील 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली.
ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निव़डणूका लांबणीवर पडल्या आहेत. याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 25 फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या जनतेला आता या निवडणुकांसाठी आणखी वेळ वाट पाहावी लागणार आहे, जवळपास निश्चित झाले आहे.
ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा प्रलंबित असल्याने राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती केली होती. ओबीसी आरक्षण असो किंवा नसो पण निवडणुका झाल्याचं पाहिजे, अशी याचिकाकर्त्यांकडून मागणी करण्यात आली.
Local Body Elections postponed
दरम्यान, न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे भवितव्य असणार आहे. त्यामुळे याचवर्षी निकाल लागण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न केले जातील. राज्यातील एकूण 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद तसेच 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :