Dhananjay Munde । बीड जिल्ह्याच्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
महत्त्वाचे म्हणजे विरोधकांसह अजित पवार गटाचे काही नेते देखील मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत आहेत. यावरून धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षात मतभेद आहे, असे बोलले जात आहे. आज धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. परंतु, दिल्लीला जाण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी स्वपक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेतली.
या बैठकीदरम्यान त्यांनी राजीनाम्याच्या मागणीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धनंजय मुंडे यांनी पक्षाच्या काही आमदारांवर शंका उपस्थित करत काही आमदार वैयक्तिक राग मनामध्ये ठेऊन राजीनामा मागत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde on resignation demand
“जर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी माझा राजीनामा मागितला तर मी लगेचच राजीनामा देईन. सध्या सुरु असणाऱ्या गदरोळामध्ये काही वेगळ्या गोष्टी पुढे आणल्या जात आहेत,” असा गंभीर आरोप बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :