मुंबई | १४ एप्रिल २०२५:
राज्यात सत्ताधारी महायुती सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्यांवर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला.
“उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्तेत यायची इच्छा आहे, मात्र त्यांना संधी दिली जात नाही. त्यामुळेच संजय राऊत दररोज अमित शहांवर टीका करत असतात,” असा थेट आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
Uddhav Thackeray’s party wants to join the government Chandrakant Patil said
शिवाजी महाराजांवर पुस्तक, राऊत यांना टोला
अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तब्बल ५०० पानी अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केल्याचा दावा करत पाटील म्हणाले, “शहा यांनी स्वतः संदर्भ गोळा करून हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक पुण्यात की दिल्लीत प्रकाशित करायचं, इतकाच निर्णय बाकी आहे. हे पुस्तक वाचल्यावर संजय राऊत यांना चक्कर येईल,”.
‘दररोज तुमची माणसं चालली आहेत’
शिवसेना उद्धव गटामध्ये घडणाऱ्या घडामोडींवरही टीका करत चंद्रकांत पाटील म्हणाले, “तुम्ही रोज भाजपवर आरोप करता, पण तुमच्याच पक्षातून रोज माणसं जात आहेत. केवळ सत्तेपासून दूर असल्यामुळे तुम्ही इतके नाराज आहात.”
महत्वाच्या बातम्या