शिर्डी | IPL 2025 हंगामात मुंबई इंडियन्सच्या अपयशानंतर रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी चाहत्यांकडून वाढत आहे. नुकत्याच साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांना अशाच एका चाहत्याच्या थेट मागणीला सामोरे जावे लागले.
शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी येताना रांगेत उभ्या असलेल्या एका चाहत्याने, “मॅडम, रोहित शर्माला कॅप्टन करा…” अशी विनंती केली. त्याने ही मागणी वारंवार केली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Fan Asks Nita Ambani to Make Rohit Sharma Captain Again
या प्रसंगी नीता अंबानी यांनी स्मितहास्य करत अत्यंत शांतपणे फक्त “बाबा की मर्जी” असं उत्तर दिलं. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात पाच पैकी चार सामने गमावले असून, हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहित शर्माने पाच वेळा मुंबईला IPL विजेतेपद मिळवून दिल्यामुळे त्याला परत कर्णधारपद देण्याची जोरदार मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका