जयपूर | सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) संघाने राजस्थान रॉयल्सवर (RR) ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या आरसीबीने राजस्थानला १७३ धावांत मर्यादित केले. प्रत्युत्तरात, विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर बंगळुरु संघाने १८ व्या षटकातच लक्ष्य सहज गाठले.
Virat & Salt Power RCB to Emphatic Win Over Rajasthan!
१७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी ९२ धावांची भक्कम सलामी दिली. सॉल्टने अवघ्या ३३ चेंडूत ६५ धावा करत संघाचा पाया मजबूत केला. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी, विराट कोहलीने संयमी खेळी करत ४५ चेंडूत नाबाद ६२ धावा फटकावल्या.
RCB Crushes Rajasthan Royals by 9 Wickets in Jaipur
सॉल्ट बाद झाल्यानंतर कोहलीने देवदत्त पडिक्कलसोबत भागीदारी करत सामना एकतर्फी केला. दोघांमध्ये ८३ धावांची भागीदारी झाली. पडिक्कलने २८ चेंडूत ४० धावा करत संघाला विजया पर्यंत पोहोचवले.
या विजयामुळे आरसीबीचा आत्मविश्वास उंचावला असून राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sinhagad Fort | परदेशी पर्यटकाला मराठीत शिवीगाळ करण्यास भाग पाडले; पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल
- राज्यपालांच्या संमतीशिवाय कायदे लागू करणारे तमिळनाडू देशातील पहिलं राज्य; १० विधेयकांना कायद्याचा दर्जा
- सूरज चव्हाणच्या घराच्या कामाची Ajit Pawar यांच्याकडून पाहणी; म्हणाले, “कुठेही कसूर राहता कामा नये”