Share

राज्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, प्रशासन सतर्क

Unseasonal rains accompanied by hailstorms have caused significant crop damage across various parts of Maharashtra. Districts like Jalgaon, Pune, and Gondia were hit hard, affecting wheat, onion, banana, and fruit orchards.

Pune’s Junnar taluka saw heavy rains with thunder, severely impacting fruit farmers. In Gondia, overcast skies and strong winds led authorities to issue safety warnings. While the rain brought relief from the heat, it dealt a severe blow to farmers’ heavy Crop Damage Reported.

Published On: 

Unseasonal Rain Causes Big Crop Loss in Maharashtra Monsoon

Unseasonal Rain | राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम असून, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके हातात येण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. आज पुन्हा एकदा राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह पावसाचा अनुभव आला. जळगावमध्ये अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. या गारपिटीमुळे गहू, मका, कांदा, केळी आणि फळपिकांचे सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुण्यात जुन्नर तालुक्याला पावसाचा तडाखा

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातही दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी पावसाची हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची फळबागेची मोठी हानी झाली आहे. मात्र, यामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाल्याचेही पाहायला मिळाले.

गोंदिया जिल्ह्यात हवामानात बदल, प्रशासन सतर्क

गोंदिया जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, वादळी वाऱ्यांना सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Unseasonal Rain Causes Big Crop Loss in Maharashtra

राज्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याच्या प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही