पुणे – शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिबवेवाडी भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच मुलीचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते नातेवाईकांना पाठवले. हे कृत्य केल्यानंतर दोघेही फरार झाले होते. अखेर बिबवेवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने आपल्या आई आणि तिच्या प्रियकर गुरुदेव स्वामी यांच्या अनैतिक संबंधांची माहिती घरमालकिणीला दिली होती. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने मुलीविरोधात कट रचला. घरात कोणी नसताना तिने व प्रियकराने मुलीसोबत अश्लील वर्तन करत तिचे व्हिडीओ शूट केले. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन हे व्हिडीओ नातेवाईक, वडील व बहिणींना पाठवले.
Shocking Case in Pune: Mother and Partner Arrested for Making and Circulating Daughter’s Obscene Videos
या प्रकारामुळे मुलीची समाजात बदनामी होईल, असा हेतू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघे आरोपी यानंतर फरार झाले होते. प्रकरण पोलिसांकडे आल्यानंतर तपास करून बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, संबंधित व्हिडीओ कसे आणि कुठे व्हायरल करण्यात आले, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पुण्यात घडलेली ही घटना सामाजिक व मानसिक विकृतीचे भयावह रूप आहे.
महत्वाच्या बातम्या
- RCB चा विराट विजय! जयपूरच्या मैदानावर राजस्थानचा ९ विकेट्सनी पराभव
- Sinhagad Fort | परदेशी पर्यटकाला मराठीत शिवीगाळ करण्यास भाग पाडले; पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल
- राज्यपालांच्या संमतीशिवाय कायदे लागू करणारे तमिळनाडू देशातील पहिलं राज्य; १० विधेयकांना कायद्याचा दर्जा













