Chhagan Bhujbal – कोणी विरोध केला असेल, तरी मतदारसंघातील जनता माझ्यासोबत – छगन भुजबळ

नाशिक । Chhagan Bhujbal । महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येवल्यामध्ये गेले  होते. त्यांच्या  ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध दर्शवला होता.

राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी दौरा सुरू केला आहे.

मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. यासाठी दोन्ही समाजाचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज नाशिक दौऱ्यावर होते.

त्यांच्या  ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठा आंदोलकांनी छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘छगन भुजबळ गो बॅक’, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

या विरोधानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले ‘राजकीय कारणातून कोणी विरोध केला असेल तरी मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे. मतदारसंघाचा आमदार या नात्याने मतदारसंघातील बळीराजाचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असल्याचं भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची ट्विटर वरील पोस्ट 

शेतकरी बांधवांनो, खचून जाऊ नका!

आज मतदारसंघातील येवला तालुक्यातील कातरणी, सोमठाण देश व निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव नजिक, वनसगांव या गावांत वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्यात यावेत, यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बाधित शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षण फी माफीबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

बाधित क्षेत्राचा विचार करता पीक विम्याबाबतही शासन स्तरावरून प्रयत्न करणार आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.

आज शेतीची पाहणी करत असतांना काही महिला शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. त्यांना खचून जाऊन नका, सरकार आपल्यासोबत असून शासनाच्या वतीने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास देत धीर दिला. आज मला कोणी कोणत्याही कारणामुळे विरोध केला असेल तरी मतदारसंघाचा आमदार या नात्याने मतदारसंघातील बळीराजाचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांसमवेत सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी पाहणी केली. राजकीय कारणातून कोणी विरोध केला असेल तरी मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे.

यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसिलदार शरद घोरपडे, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल – मनोज जरांगे

मनोज जरांगे  ( Manoj Jarange ) म्हणाले, “जो व्यक्ती शेतकऱ्यांच्या मुलांना आरक्षण देऊ नका म्हणत असतो, त्याचबरोबर जो ( Chhagan Bhujbal ) व्यक्ती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अशा माणसाबद्दल काय बोलायचं.

त्या माणसाने शेतकऱ्यांच्या बांधावर जायला नाही पाहिजे. तो ( Chhagan Bhujbal ) माणूस शेतकऱ्यांच्या बांधावर गेला तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल. तो माणूस म्हणजे पनौती आहे.

त्यामुळे त्या ( Chhagan Bhujbal ) माणसाबद्दल बोलणं आम्हाला नको वाटतं. मंत्री गेल्यावर शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं काही नाही. शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी प्रशासन आहे.

प्रशासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तयार करत आहे. शेतकऱ्यांना वाचवा, शेतकऱ्यांना मरू देऊ नका, अशी माझी सरकारला विनंती आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.