🕒 1 min read
Jasprit Bumrah | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएलची सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
लवकरच आयपीएल 2024 चा लिलाव पार पडणार आहे. दुबईमध्ये हा लिलाव होणार आहे. याआधीच आपल्याला अनेक संघात मोठे बदल झालेले दिसले आहे.
सर्वात मोठा बदल मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) झाला आहे. कारण मुंबईचा जुना खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) पुन्हा एकदा संघात सामील झाला आहे.
हार्दिक पांड्या मुंबईमध्ये सामील झाल्यानंतर संघातील स्फोटक गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, “जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे.
क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याने ( Jasprit Bumrah ) उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. हार्दिक पांड्या मुंबईमध्ये सामील झाल्यानंतर त्याला ( Jasprit Bumrah ) नक्कीच वाईट वाटत असणार.
त्याला वाईट वाटणं योग्य आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण रोहित शर्मानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार तोच ( Jasprit Bumrah ) झाला असता.
मी इतके दिवस संघासाठी मेहनत करत आहे आणि तुम्ही माझा विश्वासघात केला, असं कदाचित जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) वाटत असेल.”
Gujarat will be led by Shubman Gill
दरम्यान, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर गुजरात टायटन्सचे नेतृत्व कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
गुजरातने हा प्रश्न सोडवला आहे. गुजरातने संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवलं आहे. गेल्या आयपीएल हंगामामध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच कामगिरीचं त्याला फळ मिळालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Satyashodhak Movie | ‘अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंचा लूक रिलीज
- Narayan Rane | कोण तो, त्याला काय कळतं; नारायण राणेंची मनोज जरांगेंवर खालच्या स्तराची टीका
- Chhagan Bhujbal | येवला दौऱ्यात होतीये छगन भुजबळांची फजिती; भुजबळ गो बॅक घोषणा देत मराठा आंदोलकांनी घेरलं
- ST STAND – ट्रीपल इंजिन सरकारच्या दिरंगाईने पुणेकर त्रस्त; चार वर्ष झाले शहराला बस स्थानक मिळेना
- Rohit Sharma | रोहित शर्मा करणार टी-20 मध्ये पुनरागमन? पुन्हा होऊ शकतो टी-20 संघाचा कर्णधार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











