Chhagan Bhujbal | येवला दौऱ्यात होतीये छगन भुजबळांची फजिती; भुजबळ गो बॅक घोषणा देत मराठा आंदोलकांनी घेरलं

Chhagan Bhujbal | नाशिक: गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीने हजेरी लावली.

यानंतर राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात ओबीसी-मराठा वाद सुरू असताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे.

त्यांच्या  ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध दर्शवला आहे. सकल मराठा समाजाने छगन भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली आहे.

Unseasonal rain lashed the state

मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आला आहे. यासाठी दोन्ही समाजाचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज नाशिक दौऱ्यावर आहेत.

त्यांच्या  ( Chhagan Bhujbal ) या दौऱ्याला मराठा समाजाने तीव्र विरोध दर्शवला आहे. कोमटगाव रेल्वे पुलाजवळ मराठा संघटना आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या आहे.

या ठिकाणी मराठा आंदोलकांनी छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘छगन भुजबळ गो बॅक’, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाची ही मागणी आम्हाला मान्य नाही असं छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) यांनी मराठ्यांच्या मागणीला विरोध केल्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे.

यानंतर छगन भुजबळ  ( Chhagan Bhujbal ) आणि मनोज जरांगे ( Manoj Jarange ) एकमेकांवर टीका टिपणी करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने आज छगन भुजबळ यांच्यात ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.