Balasaheb Thorat Resigns – बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

Balasaheb Thorat – बाळासाहेब थोरात  ( Balasaheb Thorat Resigns ) यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकालानंतर काँग्रेस मधील मतभेद समोर आले. आता बाळासाहेब थोरात यांनी राजनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे सांगितले.

घटनाक्रम- 

 सत्यजित तांबे पत्रकार परिषद –

“मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आलेलो असल्यामुळे मी भविष्यामध्ये अपक्षच राहील अशी माझी भूमिका असल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आमदार म्हणून अपक्ष म्हणूनच काम करणार आहे”, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.

“निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी करणार असल्याचे पक्षातील वरिष्ठाना सांगितले आहे. मात्र वडील आमदार असल्याने तुम्हाला तिकीट देता येणार नसल्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली. त्यांनतर जे राजकरण सुरु झालं, तांबे परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचलं गेलं, यात बाळासाहेब थोरात यांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला

सत्यजितला स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, त्याला बरीच वर्षं राज्याच्या राजकारणात काम करायचंय. या सगळ्याचा विचार करून त्यानं निर्णय घ्यावा, असा सल्ला अजित पवार ( Ajit Pawar Advice to Satyajit Tambe ) यांनी दिला.

सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि वडील सुधीर तांबे हे कॉंग्रेसच्या विचारांचे आहे, त्यामुळे सत्यजित तांबे ( Satyajit Tambe ) हे थोरामोठ्याचे ऐकतील असं वाटतं असेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे

सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत- छगन भुजबळ

“मी इतकी वर्ष झाली, राजकारणात आहे. पण अशा प्रकारे एबी फॉर्म कोण घेतं आणि फॉर्म घेताना पाहत नाही, हे चुकीचं आहे. फॉर्म घेताना सर्व काही पाहिलं जातं. त्यामुळे हे असं कसं झालं? सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत. यावर आता बाळासाहेब थोरात साहेबांनी बोललं पाहिजे. खरं काय झालं हे थोरात साहेबच सांगू शकतात, असं माझं म्हणणं आहे. जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावरून मला वाटतं की, सत्यजीत तांबे काँगेसमध्ये परतणार नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

फॉर्म मिळाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी ‘OK’ उत्तर पाठवलं 

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया देत पुरावे देखील सादर केले आहेत. सत्यजित तांबेंना दिलेला अर्ज योग्यच होता, असं अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हंटल आहे. पुरावा म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा एक स्क्रीनशॉट सादर केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत.

सगळा मसाला आमच्याकडे आहे – नाना पटोले 

“भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आम्हाला द्यायचा आहे, आम्हाला सर्वांना जोडून घ्यायचं आहे. पण जे कुणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात त्या लोकांचा आमच्याकडे सगळा मसाला आहे. मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना सुनावलं.

नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नाही – बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat Resigns )

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या