Share

“दमात घेऊ नका…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा, थेट मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांचं नाव घेत सुनावलं!

BJP Minister Chandrakant Patil warns Ajit Pawar to not take them lightly, reminding him that both CM and HM belong to their alliance.

Published On: 

BJP Minister Chandrakant Patil warns Ajit Pawar | Pune Exit Poll

सांगली – सत्तेत मांडीला मांडी लावून बसले तरी मनाचे बंध खरोखर जुळलेत का? असा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. कारण महायुतीमध्ये पुन्हा एकदा ‘तू तू मै मै’ सुरू झालीये. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी भाजपवर तोफ डागली आणि आता त्याला भाजपकडून तितकंच तिखट उत्तर मिळालंय. मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी अजितदादांना थेट शब्दांत सुनावल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काल अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पुण्यातील ठेवी मोडण्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. “माझ्यावर ७० हजार कोटींचे आरोप केले, पण सिद्ध झाले का?” असा सवाल दादांनी विचारला.

Chandrakant Patil vs Ajit Pawar

सांगलीत प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. पाटील म्हणाले, “ये घरला जायचयं का… असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आम्हाला दमात घेऊ नका आणि हलक्यात तर मुळीच घेऊ नका. लक्षात ठेवा, मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच आहेत.” पाटलांच्या या वक्तव्याने आता संघर्षाची ठिणगी पडली आहे.

इतकेच नाही तर, “युतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये, असं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं होतं. पण सुरुवात तिकडून झाली असेल, तर आम्ही गप्प का बसू?” असा सवालही पाटलांनी ( Chandrakant Patil ) उपस्थित केलाय.

एकीकडे चंद्रकांत पाटील असा इशारा देत आहेत, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेगळाच बॉम्ब फोडलाय. “अजितदादांना सोबत घेताना विचार करा, असं मी फडणवीसांना आधीच सांगितलं होतं,” अशी कबुली चव्हाणांनी दिलीये. त्यामुळे भाजपमध्येच अजितदादांच्या एन्ट्रीवरून किती अस्वस्थता आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. महायुतीचा हा कलगीतुरा असाच सुरू राहणार की वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर थांबणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही