PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या ‘या’ तारखेला मिळेल 13 वा हप्ता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan Yojana – प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा ( PM Kisan Nidhi Sanman Yojana ) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. शेतकरी गेल्या काही दिवसांपासून या योजनेतील 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तेराव्या हप्त्यासाठी सरकारने कडक नियम जारी केले आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. त्यामुळे तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि ई-केवायसी करून घेणे अनिवार्य केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 20 फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांना या योजनेतील (PM Kisan Yojana) तेरावा हप्ता मिळणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून 13 हप्ता कधी मिळेल? याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्र सरकार लवकरच याबाबत घोषणा करेल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( PM Kisan Yojana ) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहे. सध्या शेतकरी या योजनेतील तेराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेबद्दल (PM Kisan Yojana) अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही 155261 किंवा 1800-115526 या हेल्प नंबर क्रमांकावर कॉल करून करू शकतात. या क्रमांकावर कॉल करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही. हा फोन कॉल शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे टोल फ्री आहे.

PM Kisan Yojna योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध

  •   PM Kisan योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  • CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
  • शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.

महत्वाच्या बातम्या