Chhagan Bhujbal | “पराभव दिसल्याने त्यांना प्रचाराला आणलं”; गिरीश बापटांच्या प्रचारावरुन भुजबळांचा भाजपला चिमटा

Chhagan Bhujbal | नाशिक : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत.

भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे प्रचारासाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत. गिरीश बापट हे आजारी आहेत. त्यांना व्हीलचेअरवर आणण्यात आले. ऑक्सिजनसह ऑक्सीमीटरही लावण्यात आले असतानाही बापट हे प्रचार करताना पहायला मिळाले आहेत. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केली आहे. गिरीश बापट हे आजारी असताना प्रचाराला आलेले पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ ( Chhagan Bhujabl ) यांनीही टीका केली आहे.

भाजपने निवडणूक मनावर घेतली

“मी सुद्धा गिरीश बापट यांना पाहिलं नव्हतं, त्यांची आत्ता अवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांची अवस्था पाहून वाईट वाटलं. मला त्यांच्या तब्येतीबद्दल कल्पना नव्हती पण वाचनात आल्यानंतर खूपच वाईट वाटलं. त्यात भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांनी त्यानं प्रचाराला आणले. भाजपला पाठीमागच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने ही निवडणूक चांगलीच मनावर घेतली आहे. त्यामुळे त्यांनी गिरीश बापट यांना प्रचाराला आणलेले दिसत आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal Criticize BJP bout Girish Bapat

“मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी आणलं होतं इथपर्यंत ठीक होतं. पण आता अशा अवस्थेत प्रचाराला आणलं याचं मला फार आश्चर्य वाटलं, एखाद्या प्राण्याला असं कोण करत असेल तर आपण लगेच सांगतो की असं नको करु म्हणून पण हे तर त्यापेक्षा भयानक दिसत आहे आणि आजारी माणसाला काम करायला लावतोय, असं छगन भुजबळ यांनी भाजपला चिमटे काढले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.