Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने कोश्यारींचं मार्कशीट व्हायरल करत इतिहासात दिले भोपळे; जाता जाता उडवली टिंगल

Bhagat Singh Koshyari | मुंबई : महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना राज्यपाल पदावरुन लवकरात लवकर हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच महाविकास आघाडीनेच लावून धरली होती. वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्यावरुन विरोधकांनी कोश्यारींवर टीकेची झोडही उठवली होती.

महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपकडून राज्यपालांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र राज्यपालांनी स्वेच्छेने दिलेला राजीनामा मंजूर झाला आहे. शनिवारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शपथ घेतील. मात्र कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना चांगलीच कोपरखळी मारली आहे.

तुकडी ‘ढ’

भगतसिंह कोश्यारी यांची एक उपहासात्मक प्रगती पुस्तक नव्हे तर अधोगती पुस्तक तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअप विद्यालयाची ही अधोगती पुस्तक असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट करत भगतसिंह कोश्यारी यांना विविध विषयांवरील त्यांची मार्क दाखवण्यात आले आहेत.

‘इतिहासात दिले दोन भोपळे’

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ‘ढ’ असल्याचं मार्कशीटवर नमूद करण्यात आलं आहे. तर हजेरी क्रमांक ४२* असे दाखवण्यात आले आहे. इतिहास विषयात भोपळा, भूगोलात ३५, नागरिक शास्त्रात १७, सामान्य ज्ञानात ३४ तर कला विषयात त्यांना १०० पैकी शंभर मार्क देण्यात आले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्रातील इतिहास पुरुषांवर केलेल्या भाष्यांवरून त्यांना इतिहासात दोन भोपळे देण्यात आले आहेत. अधोगती पुस्तकासोबतच पालकांसाठी पत्र असते तसेच पत्रही लिहण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगतसिंह कोश्यारी यांची चांगलीच थट्टा करण्यात आली आहे. यावरुन आता भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-