Sharad Pawar | पवार इज पॉवर: सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेनंतर अब्दुल सत्तार सायलेंट मोडवर

Sharad Pawar | मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॉवरचा अंदाज आजपर्यंत सर्वांनाच आला आहे. त्यामध्ये मग 2019ची निवडणूक असो किंवा साताऱ्यात पावसातील सभा असो शरद पवारांच्या पॉवर गेम राजकारणात असे काही बदल घडवतात की ज्याचा कोणी अंदाजही लावू शकत नाहीत. शरद पवार मोजक्याच शब्दात टीका करुन विरोधकांचं तोंड बंद करतात. साताऱ्यात झालेल्या पावसातील सभा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती. या सभेची चर्चा राज्यात नाही देशातच नाही तर जगभरात गाजली होती. पवार घराण्यावर बोलणारे राजकीय नेते मंडळी काही कमी नाहीत. राजकारण म्हटलं की सत्ताधारी-विरोधकांमध्ये टीक-टिपण्णी ही आलीच. पण कोणी पातळी सोडून टीका करत असेल तर पवार त्यांची पॉवर दाखवणारच.

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला होता. शिवसेनेच्या बंडखोरांना खोके खोके म्हणत डिवचलं जात होतं. त्यातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार  यांनी शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

सुप्रिया सुळे इतकी भिकारXX झाली असेल तर त्यांनाही खोके देऊ, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, त्यांचे डोके तपासावे लागेल त्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके-खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली होती. अब्दुल सत्तार यांनी हा वाद शिगेला पोहचण्यापुर्वीच याबाबत माफी मागितली होती. मात्र सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेतल्याचा आरोप फेटाळला. मात्र राष्ट्रवादीकडून त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता.

सुप्रिया सुळेंचा पलटवार

“मंत्र्यांची वक्तव्यं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अशी वक्तव्यं अपेक्षित नसतात”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणाल्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटल्या होत्या.

सत्तारांनी मागितली माफी

“मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललेलो नाही. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो. सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील असं मी बोललो नाही. कोणत्याही महिला भगिनीला वाटत असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही,” असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते.

पवारांची पॉवर, सत्तार सायलेंट मोडवर

अब्दुल सत्तार आणि सुप्रिया सुळेंच्या वादानंतर आता अब्दुल सत्तार सायलेंट मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरुन आता पवारांनी आपली पॉवर दाखवली आहे का?, सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार यांचा पवारांनी करेक्ट कार्यक्रम केल्याच्या तुफान चर्चा सुरु आहेत. पवारांनी अब्दुल सत्तार यांना चांगलाच हिसका दाखवल्याने सत्तार आता सायलेंट मोडवर असल्याच्या अनेक चर्चा सुरु आहेत. तसेच आगामी निवडणुकीत भाजपमध्ये असलेल्या आपल्या खास माणसांच्या मार्फत पवार त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असेही भाकीत जाणकारांकडून वर्तविले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button