Mahashivratri Diet | शरीरात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी महाशिवरात्रीच्या उपवासात करा ‘या’ गोष्टींचे सेवन

Mahashivratri Diet | टीम कृषीनामा: 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. शिवभक्त दरवर्षी मोठ्या उत्साहाने या दिवसाची तयारी करत असतात. या दिवशी अनेक भाविक उपवास पकडतात. उपवासाच्या वेळी अनेकांना ऊर्जेची कमतरता भासते. अशा परिस्थितीत उपवासात काय खावे? जेणेकरून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळेच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यांचे सेवन केल्याने उपवासाच्या दिवशी तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील.

भाज्या (Vegetables-Mahashivratri Diet)

भाजीपाला हे एक शुद्ध अन्न आहे. त्यामुळे उपवासच्या वेळी भक्तांसाठी हा एक योग्य आहार ठरू शकतो. उपवासामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्यांचे सेवन करू शकत नाही. मात्र, उपवासाच्या दिवशी तुम्ही बटाटा, भोपळा तसेच कॉलोकेशिया या भाज्या खाऊ शकतात. या भाज्या बनवताना तुम्ही त्यामध्ये सैंधव मिठाचा वापर करू शकतात. उपवासाच्या दिवशी या भाज्यांचे सेवन केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहू शकते.

हेल्दी ज्यूस (Healthy juice-Mahashivratri Diet)

महाशिवरात्रीचा उपवास करणारे भाविक फळांपासून बनवलेल्या रसाचे सेवन करू शकतात. फळांचा रस प्यायल्याने शरीरात अशक्तपणा जाणवत नाही. त्याचबरोबर हेल्दी ज्यूसचे सेवन केल्याने शरीर दिवसभर हायड्रेट राहू शकते. महाशिवरात्रीच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी किंवा फळांचा रस पिऊ शकतात.

फळ (Fruit-Mahashivratri Diet)

बहुतांश उपवासांमध्ये फळांना विशेष महत्त्व दिले जाते. कारण फळांचे सेवन केल्याने शरीरात उर्जा कायम राहते. त्याचबरोबर फळांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक तत्त्वांचा पुरवठा देखील होतो. उपवासामध्ये तुम्ही सफरचंद, डाळिंब, संत्री, केळी इत्यादी फळांचे सेवन करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर या फळांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

ड्रायफ्रूट्स (Dry fruits-Mahashivratri Diet)

उपवासाच्या दिवशी सतत भूक लागत असते. त्यामुळे उपवासामध्ये अशा काही गोष्टींचे सेवन केले पाहिजे ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहू शकते. यासाठी तुम्ही उपवासामध्ये ड्रायफ्रूटचे सेवन करू शकतात. ड्रायफ्रूट खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्याचबरोबर याच्या सेवेन आणि शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते. त्यामुळे उपवासामध्ये ड्रायफ्रूट्सचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या