Chandrashekhar Bawankule | “अजित पवारांना 440चा करंट लागला पाहीजे”; बावनकुळेंचं आवाहन

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुणे शहराच्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, महाविकास आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.  चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर वाढला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलत असताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“त्यांना 440 व्होल्टचा करंट लागला पाहीजे” (Chandrashekhar Bawankule Criticize Ajit Pawar)

“26 तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की असा 440 व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या”, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिवसभर दौरा केला. यावेळी बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

“अजित पवारांनी परत चिंचवडचं नाव नाही घेतलं पाहिजे”

“अश्विनी जगताप यांच्या विरोधात जे निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात अश्विनीताई यांच्यासमोरचे बटण इतक्या जोरात दाबा की, 440 व्होल्ट करंट लागला पाहीजे. असा करंट लागला पाहीजे की, अजित पवारांनी पुन्हा चिंचवडचे नाव काढले नाही पाहीजे”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

“लोकांना जागा दाखविण्याची गरज आहे”

“हा करंट देण्याची ताकद या व्यासपीठावर बसलेल्या लोकांची आहे. ही करंट देण्याची ताकद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. हा करंट का दिला पाहीजे? कारण लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या आमदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उभ्या आहेत. अशावेळी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्यांना हृदय आहे की नाही, माणुसकी आहे की नाही? खरंतर असा लोकांना जागा दाखविण्याची गरज आहे” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान होणार असल्यामुळे सर्व पक्षांना हा शेवटचा आठवडा प्रचारासाठी मिळणार आहे. त्यामध्ये सर्वच पक्षांनी आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडत असताना पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-