Share

Sharad Pawar | “फडणवीसांचं महत्व वाढवावं असं मला वाटत नाही”; शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar | पुणे : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गदारोळ सुरु आहे. ही शमलेली चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट करुन पुन्हा ताजी केली आहे. ‘शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचं सांगतानाच मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे’, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. … Read more

Published On: 

Sharad Pawar | पुणे : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गदारोळ सुरु आहे. ही शमलेली चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट करुन पुन्हा ताजी केली आहे. ‘शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचं सांगतानाच मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे’, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, शरद पवार यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर भाष्य करण्याचे टाळले आहे.

त्यांचं आणखी महत्त्व वाढवावसं मला वाटत नाही

पहाटेच्या शपथविधीची अर्धीच गोष्ट सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. “त्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावसं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. फडणवीस यांनी हा विषय इतक्या दिवसांनी का काढला हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा दावा

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया (Ajit Pawar’s Reaction)

“मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही