Sanjay Shirsat | “हे घडवून आणण्यात संजय राऊतच प्यादे”; फडणवीसांनंतर शिरसाटांचा गोप्यस्फोट

Sanjay Shirsat | मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बरोबर सरकार स्थापन केलं होतं’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केल्याने राज्यात मोठा राजकीय वाद उभा राहिला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिरसाटांनी सांगितलं बंद दारामागचं सत्य

“सत्तांतरावेळी ‘मातोश्री’त बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदेवर जुळवाजुळव करण्याची जबाबरदारी उद्धव ठाकरेंनी दिली होती. तेव्हा संजय राऊत हे वेगळ्या हालचाली करत होते. आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये होतो. सकाळी उठून पाहतो, तर शपथविधी सुरु होता. त्यावेळी संजय राऊत आणि शरद पवार आपल्या कामात व्यस्त होते. ते कुठेही समोर आले नाहीत”, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.

“उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं”

“आताजर हे थांबवायचं असेल तर, एकनाथ शिंदेंच्या ऐवजी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी समोर आली आणि मोठा गेम झाला. उद्धव ठाकरेंना इच्छा नसताना मुख्यमंत्री व्हावं लागलं. हे सर्व घडवण्यात संजय राऊतांना हात होता,” असं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे.

“हे सर्व घडवून आणण्यात संजय राऊत एक प्यादे”

“एकदा शरद पवार बोलले होते, शिवसेना प्रमुखांच्या हयातील मला जमलं नाही, ते मी आता केलं. याचा अर्थ गांभीर्याने घेतला पाहिजे. हे सर्व घडवून आणण्यात संजय राऊत एक प्यादे होते. संजय राऊतांना शपथविधीचं सर्व माहिती होतं. म्हणूनच संजय राऊत त्यावर काही बोलत नाहीत. अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल,” असा दावाही संजय शिरसाटांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.