Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीवरुन राज्यात मोठी खळबळ उडाली. सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला. यावरुन गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा दावा

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया (Ajit Pawar’s Reaction)

“मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

“पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. मला बाकिच्यांबद्दल बोलायचंच नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तुम्ही दुसरे काही विषय असतील ते बोला. तुम्हाला कळत नाही. अजित पवार मागेच बोललेला आहे. तो त्याच्या मतावर ठाम राहणार. त्यामुळे तुम्ही पुन्हा उगळून काढलं तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा करुन काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.