Nana Patole | “तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे बसून”; नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

Nana Patole | नागपूर : राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले. पण नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनतर काँग्रेसच्या आणि मुख्यत: खास करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. नाना पटोले यांनी नाशिकचा हिशोब कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत चुकता करण्याचा निर्धार केला आहे. आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले नाना पटोले यांनी याबाबत भाष्य केले आहे.

“तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे बसून”

“कसबा पेठ आमचाच मतदार संघ आहे, असं भाजपचे लोक छाती ठोकून सांगतात. मात्र तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे का बसून आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून मलिदा खाण्याचे भाजपचे धोरण आहे का? असा सवाल करीत कितीही काही केलं तरी कसबा आणि चिंचवड जागा भाजप जिंकू शकत नाही”, असे नाना पटोले म्हणाले म्हणाले आहेत.

“कसबा पेठमध्ये शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) उमेदवार म्हणून उभे आहे. अमरावतीमध्ये सुद्धा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत वंचितचा उमेदवार होता. आमचा त्यांच्यासोबत काही संबंध किंवा आघाडी नाही. त्यामुळे त्या पक्षाबद्दल मी बोलण्याचं काही कारण नाही”, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.

राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका (Nana Patole criticize Radharishna vikhe patil)

“विखे पाटील फक्त सत्तेचे लालची आहेत का, असा प्रश्‍न पडतो. उद्या काँग्रेसची सत्ता आली तर विखे पुन्हा काँग्रेसमध्ये येतील त्यांच्या वाक्यातून तसाच अर्थ लावता येतो. आमचं घर बरोबरच आहे. एक दोन माणसं घेऊन गेले, म्हणजे भाजप खूप मजबूत झाली, असं होत नाही. आमचा एक तुम्ही घेतला आहे, त्याचा हिशोब लवकरच चुकता करू. त्या भागात 47 आमदार आहेत किमान 50 टक्के आमदार व खासदारांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा माझा संकल्प आहे. चोरून घेऊन जाणार नाही, तर जनतेच्या मधात जाऊन निवडून आणू”, असा निर्धार नाना पटोलेंनी केला आहे.

दरम्यान, कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी दिली असूनही शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कसब्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदावारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.