Shivsena | “लोकांना विकत घेऊन ठाकरे सरकार पाडलं”; ठाकरे गटाकडून मोठा युक्तिवाद

Shivsena | नवी दिल्ली : सध्या राज्यात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. राज्यातील शिंदे गटाच्या आमदारांवर खोके घेऊन बंड केल्याचा ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप केला जात आहे. ‘आम्ही कोणतेही खोके घेतले नाही. स्वाभिमानासाठी हे बंड केलं आहे’, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

“लोकांना विकत घेऊन ठाकरे सरकार पाडलं”

आज सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना याच मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे युक्तिवाद करण्यात आल्याचे दिसून आले. न्यायालयाची सुनावणी सुरू होताच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. ‘लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यात आलं’, असा मोठा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला आहे.

महेश जेठलानींचं स्पष्टीकरण

अविश्वास प्रस्ताव असताना विधानसभेचे उपाध्यक्ष आमदारांना नोटीस पाठवूच कसे शकतात? असा सवाल करत विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांचा पाच वर्षाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकारच नसल्याचं महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला स्पष्ट केले आहे.

“अविश्वास प्रस्तावासाठी प्रक्रिया पाळावी लागते”

‘गुवाहाटीत बसून महाराष्ट्र सरकारचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. जगातील कोणत्याही लोकशाहीत हे स्वीकारलं जाऊ शकत नाही. गुवाहाटीत बसून विधानसभा उपाध्यक्षांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या. पण ती फक्त नोटीस होती, अविश्वास प्रस्ताव नव्हता. अविश्वास प्रस्तावासाठी प्रक्रिया पाळावी लागते. विधानसभेचे नियम लोकसभेपेक्षा वेगळे असतात’, असंही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केले आहे.  ‘ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं. शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपला मतदान केलं’, असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.