Share

“धनुष्यबाण आम्हाला मिळणार नसेल तर गोठवा” : अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला द्यावे, अन्यथा ते गोठवावे, अशी मागणी केली.

Published On: 

Arvind Sawant demand on bow arrow symbol 

शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची? या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिबल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच, जर धनुष्य-बाण आम्हाला मिळणार नसेल तर ते चिन्ह गोठवा, असे कपिल सिबल (Kapil Sibal) म्हणाले आहेत.

सिबल यांनी या प्रकरणाशी संबंधित इतर सर्व महत्त्वाचे पैलूही न्यायालयासमोर मांडले. सिबल यांच्यासह ठाकरे गटाचा युक्तिवाद उद्या पूर्ण होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद सुरू होईल. दरम्यान, चिन्ह गोठवण्याच्या आजच्या मागणीवर शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Arvind Sawant demand on bow arrow symbol 

कपिल सिबल यांनी न्यायालयाकडे धनुष्य-बाण आम्हाला द्या किंवा चिन्ह गोठवा अशी मागणी केली आहे. सिबल यांनी केलेली मागणी पूर्णपणे योग्य आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते ते पाहूया. होय, आम्ही ‘धनुष्य-बाण’ चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे, कारण जेव्हा आवश्यक ती कारवाई व्हायला हवी होती, तेव्हा ती झाली नाही.

परिस्थिती या टप्प्यावर पोहोचली असताना आता दुसरा कोणता पर्याय उरला आहे? जर ‘धनुष्य-बाण’ हे चिन्ह आम्हाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात येणार नसेल, तर ते गोठवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयासमोर करण्यात आली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह ढाल-तलवारही होते. नंतर धनुष्य-बाण होते, मशाल होती. आता धनुष्य-बाण चिन्ह आम्हाला अशीच अपेक्षा आहे. पण तो आम्हाला मिळणार नसेल तर तो गोठवा ही मागणी आम्ही केली आहे.”

“कपिल सिबल आणि देवदत्त कामत यांनी सगळी उदाहरणं दिली आणि अपात्र कसे ठरवता येते ते सांगितले. सगळ्या प्रक्रिया उलटसुलट होत्या ते देखील सिबल यांनी सांगितले. विधीमंडळातला पक्ष त्याचं आयुष्य पाच वर्षांचे असते हा मुद्दाही कपिल सिबल यांनी सांगितला. राजकीय पक्ष कायम असते हे त्यांनी सांगितले आहे.” असेही अरविंद सावंत म्हणाले.

पुढे अरविंद सावंत म्हणाले की, “आमदारांना अपात्र करता येते. जर आमदार अपात्र झाले तर सगळ्या गोष्टी पुढे क्लिअर होतील. शिवसेनेच्या भावना या मशालीसह जोडल्या आहेत.”

“शिवसेनेकडे धनुष्यबाण होता, ढाल-तलावर होती, आता आम्ही मशाल घेऊन उभे आहोत. आम्ही अजूनही धनुष्यबाणावरचा दावा सोडलेला नाही. पण आम्हाला ते चिन्ह देणार नसतील तर ते चिन्ह गोठवा ही मागणी आम्ही केली आहे,” असे म्हणत अरविंद सावंत यांनी कपिल सिबल यांच्या मागणीला समर्थन दर्शविला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही