Share

Nilesh Rane | “पवार कुटुंब नासक्या मेंदूचं”; निलेश राणेंची पवारांवर जहरी टीका

🕒 1 min readNilesh Rane | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nilesh Rane | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीवरुन राज्यात मोठी खळबळ उडाली. सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला. त्यातच आता हा मुद्दा 4 वर्षांनी पुन्हा गाजत आहे. या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा दावा

“उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यावर शरद पवारांनी देखील फडणवीस यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया (Sharad Pawar’s Reaction)

“देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची वक्तव्य ते करतील, वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती. शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबावर जहरी टीका केली आहे.

निलेश राणेंची शरद पवारांवर टीका (Nilesh Rane Criticize Sharad Pawar)

“पवार साहेबांसारखा विश्वासघातकी माणूस देशात दुसरा नाही, पवार कुटुंब पूर्ण नासक्या मेंदूचं आहे. आयुष्यभर फक्त टोप्या लावायचं काम पवार कुटुंबाने केलं, मी मागे बोललो होतो फडणवीस साहेब जेव्हा पहाटेच्या शपथविधी बद्दल महाराष्ट्राला सांगतील तेव्हा पवारांना तोंड लपवायला जागा राहणार नाही”, असे निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!