Raksha Khadse | मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादीची वाट धरली. एकनाथ खडसे यांनी मागील कित्येक वर्षे भाजप पक्षाचे काम केले. यामुळेच जळगाव जिल्ह्यात भाजपचा विस्तार होऊ शकला. एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांना भाजप पक्षाकडून तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर मी…”
“भविष्यात पक्षाने मला ही जबाबदारी दिली, तर त्याच विश्वासाने मी काम करेन. मात्र पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर मी प्रामाणिकपणे काम करेन. आज अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यांना तिकीट मिळाले तर मी त्यांच्यासाठी काम करेन. मला तिकीट मिळाले तर ते माझ्यासाठी काम करतील,” असे रक्षा खडसे यांनी सांगितले आहे.
“अशी कुठलीही आमच्या पक्षामध्ये चर्चा नाही. तरीदेखील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आज खासदार म्हणून या लोकसभेची जबाबदारी माझ्यावर आहे. भविष्यामध्येही पक्षाने मला पुन्हा रावेर खासदारकीची जबाबदारी दिली. तर मी जबाबदारीने काम करेल”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार आम्ही काम करू”
“मला वाटतं की लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात लोकसभा उमेदवारीबाबत वेगवेगळे विषय समोर येत आहेत. मात्र रावेर लोकसभा निवडणुकीबाबत सध्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, त्या अनुषंगाने आम्ही काम करू. आज खासदार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाची माझ्यावर जबाबदारी आहे,” असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत
महत्वाच्या बातम्या-
- Prakash Ambedkar | “लग्न लावायचं गंगूशी अन् संसार करायचा सावित्रीशी”; शपथविधीवरुन आंबेडकरांची शरद पवारांवर जहरी टीका
- Sanjay Raut | “पुण्याच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची परिक्षा, चांगल्या मार्काने पास होईल”
- Supriya Sule | फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यांना सध्या फक्त…”
- Sanjay Raut | “ते रहस्य फडणवीस कधीच सांगू शकत नाहीत”; फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचं सडेतोड उत्तर
- Sanjay Raut | “फडणवीस जगातले दहावे आश्चर्य”; संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले