Supriya Sule | फडणवीसांनी केलेल्या दाव्यावर आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यांना सध्या फक्त…”

Supriya Sule | मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधी, त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका, महाविकास आघाडी सरकाकडून फडणवीस यांना अटक होण्याची भीती अशा अनेक विषयांनी राजकीय नेत्यांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीवर अनेक वक्तव्ये केली त्यावरुन राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

“म्हणून फडणवीस शरद पवारांचा सहारा घेत असतील”

“तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, तो मुळात देशातील चर्चेचा मुद्दाच नाही. तो फक्त देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी कदाचित सोयीचा असेल. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बातम्या लागत नसतील, म्हणून ते सध्या शरद पवारांचा सहारा घेत असतील, अशीही शक्यता आहे. कारण बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या पक्षामध्ये बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते पवारांचं नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवत आहेत, अशी शक्यता आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule Criticize Devendra Fadnavis

“कारण या राज्याची सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री आणि उर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि त्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीला अशी कंड्या पिकवायला वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता वाटायला लागली आहे,” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

“तुम से ये उम्मीद नही थी” (Supriya Sule on Devendra Fadnavis)

फडणवीस तुमच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, तुम से ये उम्मीद नही थी, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना सकाळच्या त्या शपथविधीची कल्पना होती असे विधान केलं. देवेंद फडणविस यांना मी सुसंस्कृत राजकारणी मानत होते. पण त्यांनी माझी अपेक्षा फोल ठरवली. ते जे बोलले ते त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. त्यांच्यावर इतकी जबाबदारी आहे की डेव्हलपमेंट ओरिएंटेड बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी जी स्क्रिप्ट लिहिली आहे त्याच्या पुढची स्क्रिप्ट लिहायला सांगा. मी खोटे बोलत नाही पण दुसऱ्यांची गॅरंटी मी कशी देणार? असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.