IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका! बुमराह ODI मधून आणि ‘हा’ खेळाडू कसोटीतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन दिवसेंदिवस लांबत चालले आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटीसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, तो या मालिकेचा भाग नसणार आहे.

संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय बुमराहच्या तंदुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देत आहे. कारण यावर्षी दोन महत्त्वाच्या मालिका आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना आणि वन डे विश्वचषक स्पर्धा या दोन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी बुमराह तंदुरुस्त असावा, यासाठी संघ व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत तो यावर्षी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘हा’ खेळाडू IND vs AUS कसोटीतून बाहेर (‘This’ player out of IND vs AUS test)

टीम इंडियातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreays Iyer) सध्या बेंगलोर येथे त्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. याबाबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. तो भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामधील दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. मात्र, तो या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. श्रेयस गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याची स्थानिक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.