Shivsena | “अजित पवार ‘त्या’ शपथविधीला दात न घासताच गेले होते, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

Shivsena | पुणे : राज्याच्या राजकारणात कधी कोणता मुद्द्यावरुन राजकारण गाजेल काही सांगता येत नाही. नोव्हेंबर 2019 मधील भल्या सकाळी झालेल्या शपथविधीची चर्चा इतकी रंगली आहे. की ती चर्चा आजही तितकीच ताजीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठं चक्रीवादळ आलं आणि अचानकच 72 तासांचं सरकार स्थापन झालं. त्यावरुन आजही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मोठं-मोठे गौप्यस्फोट केले जातात.

सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे शहरातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या जाहीर सभेसाठी आले होते. त्यावेळ बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “एकनाथ शिंदे यांनी केलं ते बंड नसून ती गद्दारी होती”, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मात्र त्यांच्या या टीकेवरुन आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून”

“मराठी एक म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून अशी परिस्थिती सध्या अजितदादांची झालेली आहे. तुम्हाला 23-11-2019 सकाळ आठवली असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं अजित दादा सकाळी शपथविधीला गेले तेव्हा दात न घासता गेले होते त्यांना घाई झाली होती. राज्यपालांकडे शपथ विधी करण्याची त्यांना किती घाई झाली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं म्हणतात मग तुम्ही केलं ते काय होतं ? शरद पवार साहेबांना सोडून तो शपथविधी घेतला होता, ती गद्दारी होती का शरद पवार साहेबांच्या विरुद्धचा उठाव होता ?” असा साधा प्रश्न मी त्यांना पुण्यात बसून विचारत आहे असं शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

“त्यावेळी ती गद्दारी नव्हती का?”

“पहाटेच्या वेळी अजित दादा यांनी शपथविधी करत होते तेव्हा शरद पवार साहेबांचा मुलगा स्वतःला म्हणतात त्यांनी आम्हाला फोन केले होते की अजित दादांचे पुतळे जाळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचे पुतळे जाळले. अजित पवार यांनी जो शपथ विधी केला त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मी पुण्यात बसून त्यांना प्रश्न विचारतो आहे असं म्हणत 10 जून 1999 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकसभा अध्यक्षांना स्थापनेचे पत्र दिले होते. तेव्हा ते लोक काँग्रेस म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला ही गद्दारी नव्हती का ? शरद पवार साहेबांनी काँग्रेसच्या विरुद्ध केलेली ती गद्दारी केली होती का नाही ? त्याला काय म्हणायचं याचं स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे”, असंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं आहे.

“शिवसेना संपवण्याचं काम राष्ट्रवादीने केलं”

“शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली त्यांच्या विचारांवर ती शिवसेना वाढली. त्यामध्ये इतरांचे योगदान नाही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान नाही ते स्वतः अजित दादा कबूल करतात. हे शिवसेना संपवण्याचं काम संजय राऊत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी पक्षाने केलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर युती केली आहे. पण ग्रामीण भागात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संपवून टाकलं आहे” असा गंभीर आरोपही नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी पक्षावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.