Ajit Pawar | “बेडकाचं फुगलेपण काही खरं नसतं”; अजित पवारांचा राहुल कलाटेंना खोचक टोला

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करत महविकास आघाडीविरोधात पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगूनही राहुल कलाटेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यावर बोलताना आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राहुल कलाटेंना खोचक टोला लगवला आहे.

अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जोरदार टोला लगावला आहे. याशिवाय ‘कार्यकर्त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत कसं लढायचे आहे ते नंतर ठरवू. आत्ताची निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे’ असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

“..पण ती शिवसेनेची मते होती”

“ज्यांचा अर्ज राहिला आहे, तो राहू नये म्हणून शेवटपर्यंत उद्धव ठाकरे, सचिन अहिर आणि प्रत्येकजण प्रयत्न करत होतो. कोणीही अपक्ष राहू नका सरळ लढत होऊद्या. कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत आहे. सांगत होते की, एक लाखांच्यावर मतं पडली. पण, ती शिवसेनेची मते होती,” असा टोमणा अजित पवारांनी राहुल कलाटेंना लगावला आहे.

“बेडकाला वाटतं मी फुगलो पण…

“बेडकाला वाटतं मी फुगलो आहे. मात्र, ते फुगलेपण काही खरं नसते. यात बोलवता धनी दुसराच कोणतरी आहे. कोणतरी सांगितलं, अर्ज काढू नको. विरोधकांना वाटलं असेल, राहुल कलाटेंचा अर्ज राहिल्यावर आपणांस निवडणूक सोप्पी जाईल. परंतु, कृपा करून कोणी रूसु आणि फुगू नका. कसबा आणि चिंचवडची जागा निवडून आणायची आहे,” असे आवाहन अजित पवारांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-