Sudhir Mungantiwar | “संजय राऊत जगातले आठवे अजूबे”; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

Sudhir Mungantiwar | नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “2024 च्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’सारखी होईल”, अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊतांना उत्तर देताना खोचक टोला लगावला आहे.

“राऊत जगातले आठवे अजूबे”

“संजय राऊत यांच्या मते ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ होतो. ते म्हणतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. मग तुम्ही आपल्या मुलाला डॉक्टर करणार की कंपाऊंडर? अशांना गांभीर्याने घेऊ नका. महाराष्ट्र चालवणे काही ‘हास्य जत्रा’ नाही आणि त्यातही सात अजूबे इस दुनिया में… संजय राऊत हे जगातील आठवे अजूबे आहेत”, असा मिश्किल टोला सुधीर मुनगंटीवार लगावला आहे.

“त्यांचा मेंदू कोणत्या विचाराचा आहे”

सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. “भाजप हा सडक्या विचाराचा पक्ष आहे, असे पटोले म्हणतात. पण, भाजप हा सडक्या नाही तर मूल्यवान विचाराचा पक्ष आहे. पटोले यांनी आपल्या काँग्रेस पक्षाबद्दल बोलावे त्यांनी भाजपला सडक्या विचाराचा पक्ष म्हणून दाखवून दिले की त्यांचा मेंदू कोणत्या विचाराचा आहे”, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

“जीव कोणाचाही असे महत्वाचाच”

“आदित्य ठाकरेंच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीची चौकशी व्हावी, अशी मागणी सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. जीव कुणाचाही असो महत्त्वाचाच आहे. मोठ्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही तर सर्वसामन्यांच्याही वाहनावर किंवा त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.