Nilesh Rane | “विनायक राऊत आणखी किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार?”

Nilesh Rane | मुंबई : पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant warise) हत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यातच ‘या मृत्यू प्ररकणातील आरोपी हे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सोबत असतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीच चिथावणी असल्याचा’, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. यावरून नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

किती दिवस ठाकरेंची भांडी घासणार?

“नारायण राणे यांच्यावर टीका केली की उद्धव ठाकरे खुश होतात. त्यामुळे विनायक राऊत हे सारखं नारायण राणेंवर आरोप करतात. पण अशा प्रकारे किती दिवस उद्धव ठाकरे यांची भांडी घासणार?” असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

“ज्या आरोपीशी नारायण राणे यांचा संबंध जोडला जातोय, तो आरोपी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासोबत मागील एका वर्षात किती वेळा बसले, हे एकदा जाहीर करावं”, असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.

“पत्रकार शशिकांत वारिसे यांचं निधन झालं. ज्याच्यावर आरोप झाले, त्याच्यावर 302 चं सेक्शन लागलं आहे. पोलीस तपास करत आहेत. असं असतानाही विनायक राऊत यांनी आरोप केला आहे की, तो आरोपी राणे यांच्या जवळचा आहे, पण हाच आरोपी एक दीड महिन्यापूर्वी कलेक्टर कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासोबत उपस्थित होता की नाही? ऱिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये ते भेटत असतात, याचा खुलासा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी करावा”, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

“आंबेरकर राणेंबरोबर, त्यांच्या चिथावणीमुळेच पत्रकाराच्या हत्येचं षडयंत्र” -(Vinayak Raut)

“सिंधुदुर्गमध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली होती. भाजपचे जबाबदार केंद्रीय नेते यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मालवचं सी-वर्ल्ड आणि रिफायनरी याच्याविरोधात येणाऱ्यांची गय करू नका, प्रसंगी पोलिसांचा वापर करून प्रकल्प राबवा, असं वक्तव्य केलं होतं. हा पंढरीनाथ गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो. त्यांच्या चिथावणीमुळे वारीशेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं,” असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी नारायण राणेंवर केला आहे.

“रिफायनरीच्या पैशावर पोसणाऱ्या गुंडांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. पंढरीनाथ आंबेरकर यानी ही जी हत्या घडवून आणली आहे, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनाच उत्तर द्यावं लागणार आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यावरून प्रोत्साहन घेऊनच ही हत्या झालीय की काय अशी स्थिती आहे”, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.