Sanjay Raut | “नारायण राणेंची मानसिक अवस्था..”; राणेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं सडेतोड प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीच्या पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. ‘आंगणेवाडी जत्रेतील भाजपच्या सभेत रिफायनरी होणार, हे आपण ठासून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत वारीसेंची हत्या झाली. हा फक्त योगायोग समाजावा का?’ असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारला असता, नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. त्यावरुन संजय राऊत आणि नारायण राणेंमध्ये तुफान कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळालं आहे.

नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

“देवेंद्र फडणवीस धमक्या देणार नाहीत. भाषणात कोणत्याही धमक्या देण्यात आल्या नाही. वारसे प्रकरणाचा पोलीस करत असून, सर्व बाहेर येईल. संजय राऊतांची दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्र आणि देशाचे नेते नाहीत,” असा टोला नारायण राणे यांनी संजय राऊतांना लागवला आहे.

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

“नारायण राणे आंतरराष्ट्रीय नेते आहेत. फ्रान्स, अमेरिका, लंडन येथील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात, इतके मोठे नेते आहेत. म्हणून ते आम्हाला लहान बोलत असतील. पण, शिवसेनेने नारायण राणेंचा दोनवेळा पराभव केला आहे. विनायक राऊतांनीही त्यांच्या पुत्राचा दोनवेळा पराभव केला आहे. नारायण राणेंची मानसिक अवस्था पाहता, त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नये. आम्ही कोण आहोत, हे महाराष्ट्राला माहिती,” असं म्हणत संजय राऊतांनी चांगलाच पलटवार केला आहे.

“आम्ही डरपोक नाहीत”

“आम्ही डरपोक नाहीत, हे महाराष्ट्र सांगू शकतो. चौकशीचा सरोमिरा लागल्याने, आम्ही तीन-चार वेळा पक्ष बदलणारे नाहीत. आम्ही आमच्या पक्षाबरोबर इमान राखून काम करतोय. पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडत राहू आणि काम करू,” असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणेंवर जहरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-