Rohit Pawar | प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘रोहित पवार पोरकट’; कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | मुंबई : लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नवं शीतयुद्ध निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरुन रोहित पवारांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. कार्यकर्त्यांनी आपली आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे रोहित पवारांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केले आहे.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या? (Praniti Shinde Comment on Rohit Pawar)

“कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत. त्यांची पहिली टर्म आहे. त्यांच्यात अजून पोरकटपणा आहे. त्यांना थोडा वेळ द्या मॅच्युरिटी येईल”, असे वक्तव्य करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी खोचक टीका केली आहे. प्रणिती शिंदे यांच्या याच वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रोहित पवार यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते रोष व्यक्त करत आहेत. असे असतानाच रोहित पवार यांनी एक ट्वीट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहित पवारांचं खास ट्वीट (Rohit Pawar’s Twit)

सोलापूर जागेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षाला थांबवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी एक खास ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये “आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया,” अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये सुरु झालेल्या या शीतयुद्धानंतर आता रोहित पवारांच्या आक्रमक समर्थकांना रोहित पवारांनी शांत रहाण्याचे आवाहन केले आहे. कार्यकर्ते रोहित पवारांचं ऐकणार का? कार्यकर्ते त्यांच्या रागाला आवर घालणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.