Nana Patole | परमबीर सिंह, अनिल देशमुख प्रकरणावरुन नाना पटोलेंनी घेतला भाजपचा समाचार

Nana Patole | पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार सभेसाठी आज पुण्यात विरोधीपक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे युवानेते तसेच माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे.

“निवडणुकीच्या अगोदर मला भाजपत घ्या, असे अनिल देशमुख आम्हाला किती वेळा म्हणाले होते”, असे त्यांना विचारा असे वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केले आहे. महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळाच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या याच वक्तव्याचा आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाचार घेतला आहे.

“परमबीर सिंह यांचे 100 कोटी रुपये कोठून आणले?” (Nana Patole Ask to BJP)

“भाजपने परमबीर सिंह यांना कोठे लपवले. परमबीर सिंह यांचे 100 कोटी रुपये कोठून आणले? असे प्रश्न आम्ही त्यांना या अधिवेशनातही विचारणार आहोत. परमबीर सिंह यांचे 100 कोटी रुपये भाजपलाच मिळालेले होते. अनिल देशमुख यांच्यासारख्या निरापराध माणसाला दीड ते दोन वर्षे मुद्दामहून तुरुंगात टाकले. त्यांचे राजकीय, सामाजिक आयुष्य संपवले. याचा हिशोब भाजपला द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपने कोणत्याही मंत्र्याने केलेल्या वक्तव्याला कोणताही अर्थ राहिलेला नाही,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“भाजपच्या कोणत्याही मंत्र्याच्या कोणत्याही वक्तव्याला अर्थ उरलेला नाही. जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजप पक्ष पूर्ण करू शकलेला नाही”, अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

“भाजपच्या थोतांडाला लोक कंटाळले” (Nana Patole Criticize BJP)

“भाजपने जनतेला अनेक आश्वासनं दिली. महागाई कमी करू असे सांगितले होते. मात्र महागाई वाढली. दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असे सांगितले होते. मात्र आता बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ, असे सांगितले होते. मात्र हा हमीभाव देण्यात आलेला नाही. कोण येणार, कोण जाणार होतं? तसेच खोक्याचे राजाकारण सर्वांनाच पाठ झालेले आहे. भाजपच्या या थोतांडाला लोक कंटाळले आहेत,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.