Ajit Pawar | “शिंदेंचं बंड नाही तर गद्दारी होती”; अजित पवारांची शिंदे गटावर बोचरी टीका

Ajit Pawar | पुणे : राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने मोठा सत्ताबदल झाला. त्यावरुन विरोधकांनी त्यांना ‘गद्दार’ म्हणत टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे (aaditya Thackeray) हेदेखील सध्या चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पोटनिवडणुकीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राजेंद्र गवई, सचिन खरात हेही चिंचवड येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपस्थित होते. नाना काटे यांच्या प्रचारासाठी हे तिन्ही नेते चिंचवडमध्ये जाहीर सभा घेत आहेत. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

“शिंदे यांचं ते बंड नव्हतंच ती गद्दारी होती” (Ajit Pawar criticize to Eknath Shinde)

“शिवसेनेला येथे एकत्र बोलावण्यात आलं. कारण 26 तारखेची होणारी निवडणूक आहे. मेळावा घेण्याचं ठरलं आहे. शिवसेना आणि महिला येथे उपस्थित आहेत. वेगळ्या अंगानी ही निवडणूक बघीतली पाहिजे. वरळीत आदित्य ठाकरे यांनी लक्ष घातलं. व्हिडीओ कान्फरन्सच्या माध्यमातून बैठका होत होत्या. कोरोना काळात बेड वाढविण्यात आले. ऑक्सिजन प्लँट राबवत होतो. कुठंही आर्थिक बाबतीत अडचण येऊ दिली नाही. पण, जून महिन्यात शिंदे यांच्या नेतृत्वात काही जणांनी गद्दारी केली. शिंदे यांचं ते बंड नव्हतंच ती गद्दारी होती”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“विचारधारा वेगळी होती. पण…” _Ajit Pawar

तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कारभार सुरू केला. विचारधारा वेगळी होती. पण, राज्याचे हित समोर ठेवून काम केलं. राज्याचा विकास करण्यासाठी काम सुरू होतं. दुर्दैवाने तीन महिन्यात कोरोना आला. त्यानंतर महाराष्ट्राच्या कोरोना काळातील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली गेली” असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. मुंबईतील मराठी माणसासाठी शिवसेना काढली. शिवसैनिकांच्या जोरावर राज्यभर पोहचविली. दोन वेळा बंड झालं. 1991-92 ला बंड झालं. 2000 नंतर बंड झालं. दोन्ही वेळा बंड करणारे पुढच्या निवडणुकीत निवडून आले नाहीत. हे तिसरं बंड झालं आहे. त्यामुळं यांची जागा निवडणुकीनंतर दिसेल, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

"निवडणुका लागल्यावर बंड करणाऱ्यांची अवस्था काय होणार?"

“बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना आमदार, खासदार केले जे गेले त्यांचा शिवसेना काढण्यात काही वाटा आहे का? साधी माणसं राज्यात खासदार-आमदार झालीत ती बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं झालीत. ‘वय झाल्यानं उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांची जबाबदारी सांभाळतील’, असं सांगितलं होतं. युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे समोर आले. युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे काम करतील, हे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं. उद्या निवडणुका लागल्यावर बंड करणाऱ्यांची अवस्था काय होणार आहे?” असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-