Share

Ajit Pawar | “शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीत बदला घ्यायाचाय”; जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य

🕒 1 min read Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी “आपल्याला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक किती महत्वाची आहे. आणि त्याठिकाणी बदला घेण्याचे कारण काय आहे?” हे सांगितले आहे. “आत्ताची निवडणूक महत्वाची”  चिंचवड … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी “आपल्याला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक किती महत्वाची आहे. आणि त्याठिकाणी बदला घेण्याचे कारण काय आहे?” हे सांगितले आहे.

“आत्ताची निवडणूक महत्वाची” 

चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे ( Nana Kate ) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जोरदार टोला लगावला आहे. याशिवाय ‘कार्यकर्त्यांनी पालिकेच्या निवडणुकीत कसं लढायचे आहे ते नंतर ठरवू. आत्ताची निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे’ असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

“त्याचा बदला आपल्याला घ्यायचाय” (Ajit Pawar)

“महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगलं काम केलं पण अचानक मधेच चटर-पटर लोक आले आणि सत्ता गेली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. विधानपरिषदेत जशी एकच जागा भाजपला मिळाली असून बाकी ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. ते पाहता भाजपला धक्का देण्यासाठी पुन्हा आपल्याला ताकदीने काम करून दाखवायचे आहे” असं अजित पवार म्हणाले आहे.

“बेडूक कितीही फुगलं तरी खरं नसतं” (Ajit Pawar talk about Rahul Kalate)

“मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे पायउतार झाले आहे त्याचा बदला शिवसैनिकांनो आपल्याला घ्यायचा आहे. या शहरात पहिल्यांदाच मला निवडणूक दिले आहे. काही माणसं आता नाहीत, काही वृद्ध झाली आहे. त्यावेळी शिवसैनिकांचे काम मी पहिली आहे. हिरीरीने काम करायचे. उमेदवार निश्चित करत असतांना मी सर्वांशी बोलत होतो. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची परवानगी घेऊन नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली होती. अपक्ष म्हणून ज्यांचा फॉर्म राहिला आहे. त्यांना सगळ्यांनी विनंती केली होती. पण त्यांनी ऐकली नाही. त्याच्या मागील मात्र बोलवता धनी कोणी तरी वेगळा आहे. त्यामुळे बेडूक कितीही फुगलं तरी खरं नसतं. आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायचे आहे. कसबा आणि चिंचवडची जागा निवडून आणून दाखवायची आहे. ज्यांचे निधन झाले त्यांना नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर आणि विधानपरीषदेवर आमदार करण्यात माझी मदत राहिली आहे”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

“नाना काटे निवडून आणा”

दुसरीकडे भाजपने चुकीचं काम केलं. मतदान करण्यासाठी दोन्ही दिवंगत आमदारांनी मोठेपणा दाखवून मतदान केलं होतं. स्वार्थपणा भाजपच्या नेत्यांनी केला. नाना काटे यांनाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आणा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही