Sanjay Raut | “दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर….”; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदेंवर चांगलच धारेवर धरलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. देशाच्या टॉप टेन मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव आले नाही. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“एकनाथ शिंदे यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचं नाव त्या यादीत नसावं. दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर बसवल्याने महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही” (Sanjay Raut Criticize Eknath Shinde)

“मुळात त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. पहिल्या दहा जणांमध्येही त्यांचे नाव नाही हे दुर्देव आहे. महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे. जगात राज्याचं महत्त्व होतं. गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र खिजगणतीत नाही. उद्धव ठाकरे पहिल्या पाच आणि चारमध्ये होते. ते पहिल्या क्रमांकावर जात असतानाच सरकार पाडण्यात आलं. महाराष्ट्राचा विकास पाहवत नव्हता. म्हणून ठाकरे सरकार पाडण्यात आलं”, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

“दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर”

“महाराष्ट्राची प्रगती आणि विकास खुंटला आहे. फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर बसवल्याने महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. उताराला लागलेली गाडी असते अशी ही उताराला लागलेली गाडी आहे. म्हणून महाराष्ट्र शिखरावर निघाला होता तो परत खाली कोसळताना दिसतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या दहामध्ये नाहीत याचं वाईट वाटलं पाहिजे मिंधे गटाला आणि भाजपला. पण त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील हे फार दुर्देव आहे. आज महाराष्ट्राशिवाय राष्ट्र चालवणं सोपं आहे हे दिल्लीचं तख्त दाखवून देतोय. म्हणूनच एकनाथ शिंदे हे पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाहीत”, अशी जहरी टीकाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-