Weather Update | उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमान 35 अंशावर

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये तापमानाचा (Temprature) पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाची चटके बसू लागले आहे. मुंबई पुण्यातील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात देखील घट झाल्याचे दिसून आले आहे.

फेब्रुवारीच्या मध्यापूर्वीच राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा तापायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसला जाऊन धडकला आहे. अशा परिस्थितीत 15 फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान (Weather Update) खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईकरांना देखील गेल्या दोन दिवसापासून उन्हाची चटके सहन करावे लागत आहे. मुंबई पुण्यासह राज्यात उष्णतेची लाट पसरत चालली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, थंडी संपतात लगेच उन्हाचे चटके (Weather Update) जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

राज्यातील तापमानात वाढ होत चालली आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे (Weather Update) शेतीतील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतीतील गहू, हरभरा, मका या पिकांना वातावरणाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.