Share

KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार तयारी, पाहा व्हायरल VIDEO

🕒 1 min read KL Rahul & Athiya Shetty | मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाच्या (Wedding) चर्चेला जोर आला आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या … Read more

Published On: 

🕒 1 min read

KL Rahul & Athiya Shetty | मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाच्या (Wedding) चर्चेला जोर आला आहे. या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या आठवड्यात या दोघांचा लग्न समारंभ होऊ शकतो. कारण या दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पाली हिल्स बंगल्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

केएल राहुलचे पाली हिल्स येथील घर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवले गेले आहे. सोशल मीडियावर त्याच्या घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो अथियासोबत 23 जानेवारी रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा त्याच्या घराच्या सजावटीनंतर चांगल्याच रंगल्या आहेत. पण, अथिया आणि राहुल यांच्या कुटुंबीयांकडून किंवा त्यांच्याकडून लग्नाबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण दोघांचं लग्न यावर्षी होणार असल्याचं सुनील शेट्टी (Sunil Shetty) एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार, 23 जानेवारी रोजी अथिया आणि केएल राहुल सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील बंगल्यात लग्न गाठ बांधणार आहे. 21 जानेवारीपासून या दोघांचे लग्न समारंभ सुरू होणार आहे. यामध्ये हळद, संगीत, मेहंदी इत्यादी कार्यक्रम पार पडतील. या दोघांच्या लग्न समारंभामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अथिया शेट्टी आणि केएल राहुल 2018 पासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांनीही आपलं नातं जाहीरपणे स्वीकारलं आहे. अथिया अनेकदा राहुलच्या मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. तर, दोघं सोशल मीडियावर सतत एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Cricket Entertainment Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या