Shivsena | “एकनाथ शिंदेंनी दावा केलेलं पदच बेकायदेशीर”; ठाकरे गटाच्या वकिलांचं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivsena | मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर आपला हक्क सांगितला आहे. याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हाबाबत अद्याप निर्णय दिलेला नाही. याबाबत 20 तारखेला पुढील सुनावणी होणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे वकील सनी जैन (Sunny Jain) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाकडून ज्या पदावर दावा सांगितला जातोय, ते पदच बेकायदेशीर आहे’, अशी प्रतिक्रिया वकील सनी जैन यांनी दिली आहे.

“शिंदे गटाकडून ज्या पदावर दावा सांगितला जात आहे, ते ‘मुख्य नेता’ पद बेकायदेशीर आहे. पक्षाच्या संविधानात असे कोणतेही पद नाही. संविधानात ‘मुख्य नेता’ पद नसेल तर एकनाथ शिंदे स्वत:ला ‘मुख्य नेता’ कसे काय म्हणू शकतात, यावरच आज युक्तीवाद झाला”, असे सनी जैन म्हणाले आहेत.

“आम्ही निवडणूक आयोगाकडे एक पत्र सादर केलंय. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ‘पक्षाच्या संविधानावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन’ अशी शपथ घेतली होती. आज त्याच संविधानाला शिंदे गट बेकायदेशीर म्हणत आहेत. हा खूप मोठा विरोधाभास आहे. एकनाथ शिंदे स्वत:ला ‘मुख्य नेता’ म्हणत आहेत, पक्षप्रमुख म्हणत नाहीत,” अशी माहितीही सनी जैन यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या