Shivsena | “काही लोकांना घेऊन बाहेर पडणं बेकायदेशीर”; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivsena | मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे असे दोन गट तयार झाले. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आपला  हक्क सांगितला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.

मागील सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. आजच्या सुनावणी ठाकरे गट आपली बाजू मांडणार आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत. या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला आहे.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा. न्यायालयाचा निर्णय आधी येऊ द्या. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. शिंदे गटाची अनेक प्रतिज्ञापत्र बोगस चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहावी, अशी विनंती. काही लोकांना घेऊन पक्षातून बाहेर पडणं हे बेकायदेशीर आहे”, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

धनुष्यबाणाच्या सुनावणीवर आज अंतिम निकाल येण्याची शक्यता फार कमी आहे. आज दोन्ही बाजूचे वकिल युक्तीवाद करणार, त्यानंतर निकाल या आठवड्यात अंतिम निकाल येऊ शकतो, पण आज अंतिम निकाल येणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

“शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते”, असे सांगत कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.

दरम्यान, शिवसेना पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय? आमच्याकडे संख्याबळ जास्त संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा लवकर निर्णय घ्यावा. आम्ही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चूक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य आहे, असे सांगत शिंदे गटाचे वकील महेश जेठमालांनी यांचा युक्तिवाद  केला आहे.

महत्वाच्या बातम्या :