IND vs NZ | सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू पडला मालिकेतून बाहेर

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्युझीलँड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून खेळली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे न्युझीलँडविरुद्धच्या या मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यर पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये जाणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत अय्यरच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

भारत आणि न्युझीलँड यांच्यामध्ये होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. तर, या मालिकेतील दूसरा सामना 21 जानेवारी रोजी रायपूर येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना इंदोरमध्ये 24 जानेवारी रोजी होणार आहे.

श्रेयस अय्यरने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये भारतीय संघासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहे. अय्यरने तब्बल 17 सामन्यांमध्ये 724 धावा केल्या आहेत. मात्र, नव्या वर्षाची सुरुवात त्याच्यासाठी चांगली नव्हती. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये तिन्ही सामन्यात अनुक्रमे 28, 28 आणि 38 धावा केल्या आहेत. दरम्यान, न्युझीलँडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे अनुपस्थित राहणार आहे.

न्युझीलँडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या