Chitra Wagh | “…तेव्हापासून त्यांचे मनस्वास्थ ठीक नाही”; चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chitra Wagh | नवी दिल्ली :  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात आले. ”महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयात होत असते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे 40 आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रिपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले”, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यावरुन आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

“कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून त्यांचे मनस्वास्थ ठीक नाही. हे आता त्यांच्या कृतीतून आणि लेखणीतून जाणवू लागलं आहे. त्यामुळे यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे कोणत्याही अंधश्रद्धेला थारा नाही. हे महाराष्ट्रातला प्रत्येक जण जाणतो”, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

“निवडणूक आयोगाचा जो निकाल असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल. आज याबाबत स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे”, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ”शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही”, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊतांनी सामनामधून लगावला होता.

महत्वाच्या बातम्या :