Team India | श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्यावर टीम इंडियाच्या पार्टीत दिसला ऋषभ पंत, पाहा VIDEO

Team India | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली आहे. टीम इंडियाने या मालिकेमध्ये 3-0 ने दमदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर सगळ्यांकडून संघाचे कौतुक केले जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि मीम व्हायरल होत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा माजी स्टार खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी ट्विटरवर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियातील खेळाडू ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या इत्यादी खेळाडूंचे मुखवटे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये ऋषभ पंतचा मुखवटा देखील वापरण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पंतचा चेहरा बघून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. हे सर्व मुखवटे लावलेले खेळाडू या व्हिडिओमध्ये संगीत वाद्य वाजवताना दिसत आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीला मराठी सुपरहिट गाणे ‘हृदयी वसंत फुलताना’ वाजत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत असताना हरभजन सिंगने त्याला कॅप्शन दिले आहे, “श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा तिरुअनंतपुरममधील पार्टी सीन.”

टीम इंडिया (Team India) च्या या व्हिडिओमध्ये ऋषभ पंतला बघून नेटकऱ्यांच्या कमेंट्स

@HIMANSHU___14
bhajji pant to h hi nhi team m 
@Shivams06248
Rishabh pant 
@MiteshPargi6
Rushabh pant bhi aya party kar ne paji.
@Chandrakantgwal
mean while urvashi is in confusion – rishab yhaa kaise aaaya.
@gaurav_pathre
Has Rishabh pant joined the party from his room ??
@bookofcricket
Are Rishabh pant bhi agaya
@meer_xuenain
But Rishab Ko kyu thoos rha ha iss mai
@dubeygaurav553
Good to see pant.

हरभजन सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ  मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील मजेशीर कमेंट करत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.