Sanjay Raut | “महाराष्ट्रात जादुटोणा? शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून..”; सामनातून गंभीर आरोप

 

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्रात जादूटोण्याची चर्चा घडत आहे, हे सामनातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. “महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा कायदा केला, पण शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे. मंत्रालयात तसेच इतर सरकारी कार्यालयात अशीच चर्चा आहे’, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटलं आहे.

“शिंदे आणि त्यांचे 40 आमदार गुवाहटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे म्हटले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रिपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा त्याच मंदिरात जाऊन हे लोक नवस फेडून आले. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची, यज्ञ वगैरे प्रथांना स्थान नाही. पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकार पुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही”, असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत काल घडलेली घटना, विरोधकांचा बुलंद आवाज धनंजय मुंडे यांच्या गाडीचा भीषण अपघात, संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले, मुख्यमंत्रिपदावर असताना उद्धव ठाकरे यांना अखेरच्या काळात भयंकर आजाराला सामोरे जावे लागले. तेव्हापासूनच सरकार पाडण्याचे प्रयोग सुरु झाले. म्हणजे महाराष्ट्रातील करणी टोळीचे हे अघोरी प्रयोग आधीपासूनच सुरु होते, या अघोरी प्रयोगांचे फटके महाराष्ट्राच्या जनमानसाला बसत आहेत. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पांडुरंगास साकडे घालावे, अशी मागणी संजय राऊतांनी सामनातून केली आहे.

“महाराष्ट्रात कुणी जादुटोणा करतंय, अशी लोकांची भावना असणे हीच पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे” असे मत संपादकीयमधून मांडण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.