Sudhir Mungantiwar | “ठाकरेंना चिन्ह मिळणार तर, इतर भावांचं काय होणार”; पक्ष, चिन्हावरुन मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई : शिवसेना आणि शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगसमोर महत्त्वाची सुनवाणी होणार आहे. दुपारी चार वाजताच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. ‘शिवसेना (Shivsena) हा पक्ष माझ्या वडिलांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे’, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार सांगत आले आहेत. या पार्श्वभूमीवरुन उद्धव ठाकरेंना शिंदे गट आणि भाजपकडून वारंवार टीका करण्यात आली. आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील याबाबत भाष्य केले आहे.

“उद्धव ठाकरे हे वारंवार म्हणत आहेत, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मग इतर जे दोन भाऊ आहेत. त्यांच्या परिवारातील लोकांचं काय? पक्षातील दोन तृतीयांश सदस्यांचे मत शिंदे गटाच्या बाजूने आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू ऐकून सत्याच्या बाजूने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अवैधरित्या मिळवल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी मागील सुनावणीच्या वेळी केला आहे. येत्या 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे.

दरम्यान, शिवसेनेतील प्रतिनिधी सभेतील सदस्यांची निवडणूक घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. परवानगी नाही दिली तर शिवसेना प्रमुख पदाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.